संग्रहित छायाचित्र 
मुंबई

१२ जूननंतर कोसळधारा

मेमध्ये दमदार हजेरी लावल्यानंतर गायब झालेला मान्सून आता १२ जूननंतर सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : मेमध्ये दमदार हजेरी लावल्यानंतर गायब झालेला मान्सून आता १२ जूननंतर सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

राज्यात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल. राज्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, धुळे आणि जालना जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. १३ ते १८ जून या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाळ्याच्या तयारीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १९ ते २६ जून या आठवड्यात विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी योग्य वेळ आणि हवामानाचा अंदाज घेऊन पुढील नियोजन करावे. त्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळेल आणि नुकसान टाळता येईल.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा