मुंबई

बँका, वित्तीय कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री; सेन्सेक्समध्ये ३९० अंकांनी घसरण

३०- शेअर बीएसई सेन्सेक्स ३९०.५८ अंक किंवा ०.६८ टक्का घसरून ५७,२३५.३३ वर बंद झाला

प्रतिनिधी

मुंबई शेअर बाजारात गुरुवारी सेन्सेक्स ३९० अंकांनी घसरला. बँका, वित्तीय कंपन्या आणि कॅपिटल गुड्स‌ कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याचा हा परिणाम आहे. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गुरुवारी रुपया ५ पैशांनी घसरून ८२.३८ झाला.

वाढती महागाई आणि जीडीपी दरवृद्धीविषयी चिंता व्यक्त केली जात असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसते. कमजोर रुपया, कच्च्या तेलाचे वाढते दर याचाही बाजारावर प्रभाव राहिला, असे एका दलालाने सांगितले.

दि ३०- शेअर बीएसई सेन्सेक्स ३९०.५८ अंक किंवा ०.६८ टक्का घसरून ५७,२३५.३३ वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १०९.२५ अंक किंवा ०.६४ टक्का घटून १७,०१४.३५ वर बंद झाला. सेन्सेक्स वर्गवारीत विप्रोचा समभाग सर्वाधिक ७.०३ टक्के घसरला, तर त्यानंतर एसबीआय, एल ॲण्ड टी, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स‌, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी, एचडीएफसी बँक यांच्या समभागात घसरण झाली, तर एचसीएल टेक, सन फार्मा, डॉ. रेड्डीज, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अल्ट्रा टेक सिमेंट यांच्या समभागात ३.१९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.३१ टक्का वाढून प्रति बॅरलचा भाव ९२.७४ अमेरिकन डॉलर्स झाला, तर विदेशी संस्थांनी बुधवारी भारतीय भांडवली बाजारात ५४२.३६ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Mumbai : अनधिकृत फेरीवाल्यांची तक्रार आता व्हॉट्सॲपवर; BMC ची नवी सुविधा सुरू

NEET UG 2026 Re-Exam : परीक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; २१ जूनचा मेगाब्लॉक रद्द

Mumbai : पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; ट्रॅक सर्किट बिघाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

NEET पुनर्परीक्षा होईपर्यंत Telegram वर बंदी; केंद्राच्या निर्णयाविरोधात कंपनीची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

'पास करून देतो' म्हणत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; संतप्त पालकांकडून शिक्षकाला चोप