Mumbai Weather Update: मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागात गडद ढग आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने शहरात मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे, जो १९ जुलैपर्यंत असणार आहे.
याशिवाय, हवामान खात्याने आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. तर मुंबई महानगर पालिकेने मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळेल; तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे अशी माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. या खेरीज भरती आणि ओहोटीचीही माहिती दिली आहे.
https://twitter.com/mybmc/status/1813776692696998271
लोकल ट्रेनचे अपडेट्स
> ८ वाजता मिळालेल्या माहितीनुसार मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सुद्धा 5 ते 6 मिनिट उशिराने धावत आहे.
> रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचलेलं नाहीय. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरु आहे.
> कल्याणमध्ये जोरदार पाऊस असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिरा धावत असल्याने कल्याण स्थानकात चाकरमनी आणि प्रवशांची गर्दी जमलेली आहे.
> सारखा जलमय होणारा अंधेरी सबवे सुरू आहे.