मुंबई-गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी; १९ सप्टेंबर सकाळी ८ ते २० सप्टेंबर रात्री ११पर्यंत वाहतूक बंद संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबई-गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी; १९ सप्टेंबर सकाळी ८ ते २० सप्टेंबर रात्री ११पर्यंत वाहतूक बंद

सन २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर गौरी आणि सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंधांमध्ये राज्य शासनाने सुधारणा केली आहे.

Swapnil S

रत्नागिरी : सन २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर गौरी आणि सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंधांमध्ये राज्य शासनाने सुधारणा केली आहे. याबाबत परिवहन विभागाने अधिकृत शुद्धीपत्रक जारी केले आहे.

सुधारित आदेशानुसार, गौरी व सात दिवसांच्या गणपती विसर्जनासह कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या सर्व जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

यामध्ये ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे. यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या मूळ आदेशात १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता निर्बंध संपणार असल्याचे नमूद होते. मात्र, आता त्यात सुधारणा करून १९ सप्टेंबर सकाळी ८ ते २० सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत सलग बंदी लागू करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कृत्रिम फुलांना पसंतीची मोहोर; चिनी बनावटीच्या फुलांना पसंती, क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड

Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती

Mumbai : ब्रीच कँडीकरांचा ‘बीएमसी फुटपाथ रिपोर्ट कार्ड’; ‘कारवाईची नोंद व जबाबदारी निश्चित करा, रहिवाशांची मागणी

BRICS Summit 2026 : ‘ब्रिक्स’ साठी जिनपिंग दिल्लीत येणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र