ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई फेसबूक
मुंबई

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना जीवनगौरव पुरस्कार; उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी मुंबईत पुरस्कार वितरण

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा यंदाचा बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार पत्रकार प्रशांत कदम यांना, तर हिंदी पत्रकारितेतील भीष्माचार्य बाबुराव पराडकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा यंदाचा बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार पत्रकार प्रशांत कदम यांना, तर हिंदी पत्रकारितेतील भीष्माचार्य बाबुराव पराडकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कारांचे वितरण शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार जान्हवी मुळे, दत्ताजीराव तटकरे स्मृती पत्रकारिता पुरस्कार सचिन परब, स्वातंत्र्यसेनानी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार संतोष आंधळे, स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख देवडीकर कृषी पत्रकारिता पुरस्कार ‘सकाळ’चे सुनील पाटील आणि भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार अविनाश महालक्ष्मे यांना जाहीर झाला आहे. नागोजीराव ऊर्फ अण्णासाहेब दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार अभय देशपांडे यांना, प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार ‘न्यूज १८ लोकमत’चे पत्रकार महेश तिवारी यांना, तर संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘ग्रामोद्धार’चे संपादक बापूसाहेब जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार सोहळ्याला पत्रकार आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर यांच्यासह विश्वस्त शरद पाबळे, किरण नाईक, मुंबई शाखेचे अध्यक्ष राजा आदाटे, मुंबई अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष दीपक कैतके, डिजिटल मीडिया परिषदेचे अनिल वाघमारे, मुंबईचे अध्यक्ष मनोज भोईर, परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, माजी सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, मन्सूरभाई शेख आणि महिला आघाडीप्रमुख शोभा जयपूरकर यांनी केले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर होणार कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विहिरी, बोअरवेलने गाठला तळ; ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती

... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर