मुंबई

आता सीएसएमटी इमारतीचा हेरिटेज वॉक!

नवशक्ती Web Desk

मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानक. ब्रिटीशकालीन सीएसएमटी स्थानकातील इमारतीचा हेरिटेज वॉक आता अधिक सोपा झाला आहे. घरबसल्या हेरिटेज वॉकसाठी ‘बुक माय शो’वर तिकीट बुक करणे सोयीस्कर झाले आहे. विशेष म्हणजे हेरिटेज वॉकसाठी एका विद्यार्थ्याला १५० रुपये तर इतरांसाठी ५०० रुपये तिकीट असणार आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक मुख्य स्थानक आहे. या स्थानकातून देशभरात मेल-एक्स्प्रेस व मुंबईची लाईफलाईन धावते. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात रोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरऊ असते. यात विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने सीएसएमटी स्थानकाला भेट देत असतात. सीएसएमटी स्थानकातील ऐतिहासिक वास्तूंचा उलगडा पर्यटकांसमोर व्हावा, यासाठी हेरिटेज वॉक संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.‌

परवानाधारकांना पर्यटकांचे स्वागत आणि आवश्यक पास देणे, ओळखपत्र आणि मार्गदर्शन यांसारख्या उद्देशांसाठी रिसेप्शन किऑस्क उभारण्याची परवानगी दिली जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या ठिकाणी हेरिटेज वॉक

मेनलाइन कॉन्कोर्स, वर्ल्ड हेरिटेज बिल्डिंग - स्टार चेंबर, स्टार चेंबरजवळील हेरिटेज गॅलरी, रेल संग्रहालय आणि सेंट्रल डोममधील स्मारक

व्हिडिओ शूटिंगला बंदी

हेरिटेज साईटमधील सर्व परवानगी असलेल्या ठिकाणी भेट देण्याच्या ठिकाणांचे छायाचित्रण करण्याची परवानगी असेल. मात्र, व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. तसेच कॅमेरा, फोटोग्राफीला परवानगी देण्यासाठी अतिरिक्त शुल्क वसूल केले जाणार नाही.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त