मुंबई

अभिनेत्री केतकी चितळेला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आणि विविध ठिकाणी २२ गुन्हे दाखल करण्यात आलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि सहा गुन्हे दाखल करण्यात आलेल्या निखिल भांबरे या दोघांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाने या दोघां विरोधात दाखल झालेले गुन्हे एकत्रित करण्याची परवानगी दिली. तर चितळेच्या नुकसान-भरपाईच्या मागणीवर सरकारसह अन्य प्रतिवाद्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य भाषेत लिहिलेली कविता फेसबुकवर पोस्ट केली. या विकृत पोस्टप्रकरणी कळव्यातील स्वप्निल नेटके या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी याप्रकरणी केतकी चितळेला १४ मे रोजी अटक केली. केतकीविरोधात राज्यात अनेक ठिकाणी २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर भांबरे याच्या विरोधात ६ गुन्हे दाखल आहेत.

पहिल्या गुन्ह्यांत जामिनावर सुटका झाल्यानंतर आणि इतर गुन्ह्यांत अटकेची कारवाई करणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतर केतकी आणि भामरे यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच वेळी सगळे गुन्हे एकत्रित करण्याचीही मागणी करत याचिका दाखल केली. आपल्याला पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली असून गुन्हा रद्द करण्यात यावा, तसेच चुकीच्या पद्धतीने अटक केल्याने भरपाई देण्याचे न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी केतकीने याचिकेत केली होती.

न्यायालयाचा निर्वाळा

एकाच व्यक्ती विरोधात एकाद्या घटनेबाबत विविध ठिकाणी अनेक गुन्हे नोंदवले गेल्यास पहिला गुन्हा मुख्य मानून अन्य गुन्हे त्यासोबत एकत्रित केले जावेत. तसेच पहिल्या गुन्ह्यातील साक्षीपुरावा अन्य गुन्ह्यांतही ग्राह्य धरला जावा, असा निर्वाळा दिला आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल