ज्येष्ठ नागरिक मुलांना घराबाहेर काढू शकतात! आयुष्याच्या सायंकाळी शांततेत जगण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

ज्येष्ठ नागरिक मुलांना घराबाहेर काढू शकतात! आयुष्याच्या सायंकाळी शांततेत जगण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आयुष्याच्या सायंकाळी शांततेने जगण्याचा ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत अधिकार आहे, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या वादाच्या प्रकरणात निर्णय दिला आहे. ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या हक्काच्या घरातून मुलांना बाहेर काढण्याची मागणी करू शकतात, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.

Swapnil S

मुंबई : आयुष्याच्या सायंकाळी शांततेने जगण्याचा ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत अधिकार आहे, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या वादाच्या प्रकरणात निर्णय दिला आहे. ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या हक्काच्या घरातून मुलांना बाहेर काढण्याची मागणी करू शकतात, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. वृद्ध आईला घरातून हाकलणाऱ्या मुलगा, सुनेला न्यायालयाने दणका दिला.

मुलुंड परिसरात राहणाऱ्या ७१ वर्षीय वृद्ध महिलेने मुलाने आणि सुनेने छळ केल्याची तक्रार 'देखभाल आणि कल्याण लवाद'कडे केली होती. मुलाने घराची मालकी आपल्या नावावर करण्यासाठी मारहाण केली. तसेच पत्नीच्या संगनमताने घराबाहेर काढले, असा आरोप वृद्ध महिलेने केला होता.

न्यायालयाचे निरीक्षण

ज्येष्ठ नागरिकांना शांततेत जगण्याचा अधिकार आहे. वृद्ध महिलेला तिच्या स्वतःच्या घरात शांततेत जगता यावे, यासाठी मुलांना घरातून बाहेर काढणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरक्षित राखणे हा ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायद्याचा मूळ उद्देश आहे.

Mumbai : २२ बेस्ट डेपोंच्या विकासाला मंजुरी; पालिकेत खडाजंगी; आधीच्या डेपो-विक्रीबाबत श्वेतपत्रिका काढा- विरोधकांची मागणी

अभियंत्यांच्या बदल्यांसाठी 'फिल्डिंग'! मुंबई पालिकेत वाढला राजकीय हस्तक्षेप; मंत्री, आमदारांसह विरोधी पक्षही अग्रसेर

Mumbai : आणखी १५० दुमजली ईव्ही बसेस; १० ओपन डबल डेकर बसची सफर, BEST समितीची मंजुरी 

FDA ची नजर आता शाळा-कॉलेजच्या कॅंटिनकडे; लवकरच दिसतील परिणाम, तुकाराम मुंढेंचे संकेत

Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी