महिला सहकाऱ्याकडे एकटक पाहणे गुन्हेगारी स्वरूपाचे नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा 
मुंबई

महिला सहकाऱ्याकडे एकटक पाहणे गुन्हेगारी स्वरूपाचे नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

कामाच्या ठिकाणी महिला कलम सहकाऱ्याच्या शरीराकडे एकटक पाहणे अनैतिक असले तरी ते ३५४-सी अंतर्गत 'व्हॉयरिझम'चा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. हा निर्वाळा देत एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्धचा एफआयआर रद्द केला.

Swapnil S

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिला कलम सहकाऱ्याच्या शरीराकडे एकटक पाहणे अनैतिक असले तरी ते ३५४-सी अंतर्गत 'व्हॉयरिझम'चा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. हा निर्वाळा देत एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्धचा एफआयआर रद्द केला. अशा वर्तनावर कंपनीच्या अंतर्गत समितीमार्फत कारवाई होऊ शकते; परंतु ते गुन्हेगारी स्वरूपाचे नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने एका विमा कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केला आणि खटला पुढे चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे न्यायालयाने नमूद केले.

... तर ठरतो गुन्हा

कायदेशीर तरतुदीनुसार, एखाद्या स्त्रीच्या खासगी कृत्यादरम्यान तिला पाहणे, तिची छायाचित्रे घेणे किंवा ती प्रसारित करणे यांचा समावेश होतो. महिलेच्या शरीराचे खासगी अवयव उघडे असतात, स्त्री स्वच्छतागृहाचा वापर करत असते किंवा सार्वजनिक ठिकाणी सहसा न केले जाणारे लैंगिक कृत्य करत असते, अशा परिस्थितींना कायदेशीर तरतूद लागू होते.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग