मुंबई उच्च न्यायालय संग्रहित छायाचित्र, पीटीआय
मुंबई

...तर भाडेकरू बनतो सहमालक; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जर एखाद्या भाडेकरूने त्याच मालमत्तेचा किंवा घराचा काही हिस्सा कायदेशीररित्या खरेदी केला असेल तर तो केवळ भाडेकरू राहत नाही. अशा स्थितीत मूळ घरमालक त्याला भाडेकरू मानून घराबाहेर काढू शकत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

Swapnil S

मुंबई : जर एखाद्या भाडेकरूने त्याच मालमत्तेचा किंवा घराचा काही हिस्सा कायदेशीररित्या खरेदी केला असेल तर तो केवळ भाडेकरू राहत नाही. अशा स्थितीत मूळ घरमालक त्याला भाडेकरू मानून घराबाहेर काढू शकत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. एकदा भाडेकरूने मालमत्तेत मालकी हक्क मिळवला की, तो मालमत्तेचा सहमालक बनतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दक्षिण मुंबईतील जुन्या मालमत्तेशी संबंधित घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. याप्रकरणी न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. जुन्या मालमत्तेत एक व्यक्ती अनेक वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होती. कालांतराने भाडेकरूने मालमत्तेच्या मूळ मालकांपैकी एकाकडून घराचा काही हिस्सा विकत घेतला. यानंतर इतर सहमालकांनी त्या व्यक्तीला भाडेकरू ठरवून निष्कासित करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली होती. या प्रकरणात तीन भाडेकरूंनी दाखल केलेला न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी अर्ज मंजूर केला. भाडेकरूने अर्ज प्रलंबित असतानाच्या काळातच भाडेतत्त्वावर असलेल्या मालमत्तेमध्ये ५० टक्के हिस्सा संपादन केला. त्यावर भाडेकरूला निष्कासित करण्याचे आदेश न्यायालयाने रद्द केला.

भाडेकरूंना दिलासा

एकदा भाडेकरूने मालमत्तेत मालकी हक्क मिळवला की, तो भाडेकरू राहत नाही. तो मालमत्तेचा सहमालक बनतो. कायद्यानुसार, संबंधित भाडेकरूला कोणताही मालक आपल्या मालमत्तेतून बेदखल करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे राज्यातील हजारो भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

एका अंध जोडप्याच्या डोळस प्रेमाची दास्तान; मुस्लिम मैत्रिणीच्या सुटकेसाठी रामकृपाल न्यायालयात

ज्येष्ठ नागरिक, वाहकामध्ये वादावादी; एसटीत स्वच्छता अधिभार लागू

मुंब्य्रात 'कैसा फसाया'ची चर्चा; जात प्रमाणपत्र प्रकरणी सहार शेख अडचणीत

राज्यात शनिवारपासून अवकाळीचा इशारा; अकोल्यात उष्माघाताचा बळी

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा...१ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव