मुंबई

किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टाचा दिलासा कायम

न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी पेडणेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी २७ ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली.

प्रतिनिधी

मुंबई : कथित जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेज्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना बुधवारी उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवला. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी पेडणेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी २७ ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली.

कोरोना महामारीत बॉडी बॅगची चढ्या दराने खरेदी केली. त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि, या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले आहे, असा दावा करत पेडणेकर यांनी अ‍ॅड. राहुल अरोटे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज गेल्या आठवड्यात सत्र न्यायाधिश एस.बी.जोशी यांनी अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान देत अटकपूर्व जामीनासाठी याचिका केली.

याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. मागिल सुनावणीच्यावेळी न्यायालयाने पेडणेकर यांना ईओडब्ल्यूच्या तपासात सहकार्य म्हणून ११, १३ आणि १६ सप्टेंबर या तीन दिवशी चौकशीला सामोरे जाण्याचे निर्देश देत सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली.तसेच या चौकशी दरम्यान जर अटकेची आवश्यक्ता भासल्यास ३० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला दिले होते. हे आदेश कायम ठेवत अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी २७ ऑक्टोबरला निश्‍चित केली.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी