मुंबई

रस्ते, पुलावर होर्डिंग्ज बंदीच, पालिका लवकरच जारी करणार नियमावली

मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी यापुढे रस्ते, पुलावर होर्डिंग्ज बंदीच घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : घाटकोपर छेडा नगर येथील बेकायदा होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी यापुढे रस्ते, पुलावर होर्डिंग्ज बंदीच घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच फुटपाथवर होर्डिंग्ज लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. यासाठीची कठोर नियमावली लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत १३ मे रोजी वादळीवाऱ्यासह जोरदार बरसलेल्या पावसामुळे घाटकोपर छेडानगर होर्डिंग्ज दुर्घटनेत १७ निष्पाप लोकांचा बळी गेला. तर ७० हून अधिक जण जखमी झाले. यामुळे मुंबईतील धोकादायक होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने ४० फूट बाय ४० फूट याच आकाराचे होर्डिंग्ज असावे, यापेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग्ज नसावे, असे सक्त निर्देश मुंबईतील सर्व प्राधिकरणांना दिले आहेत.

विद्रुपीकरण, अपघात, पर्यावरणाला धोका

मुंबईतील छोट्या रस्त्यांसह पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्ग, इस्टर्न एक्प्रेस-वेसह सर्वच ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावले जातात. अनेक वेळा हे होर्डिंग्ज लटकलेल्या स्वरूपात असल्याने वाहनांचे अपघात होतात. विशेष म्हणजे होर्डिंग्जसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे विघटन होण्यात मोठा कालावधी लागत असल्याने या छोट्या होर्डिंग्जचा पर्यावरणालाही फटका बसतो.

ब्रीज, गाड्यांवरील चलचित्रांनाही बंदी

मुंबईतील मोठ्या रस्त्यांवर असणारे छोटे ब्रीज आणि रस्त्यावरील मोठ्या ब्रीजवर मोठमोठे होर्डिंग्ज लावले जातात. यामुळेही अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे अशी होर्डिंग्ज लावण्यासही बंदी घातली जाणार आहे. शिवाय खासगी कंपन्यांच्या वाहतूक व्यवसायातील टॅक्सींवरही चलचित्रे असलेल्या जाहिरातील लावल्या जातात. यावरही बंदी घातली जाणार आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?