खांदेदुखीचा त्रास वाढतोय? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा सोप्या टिप्स

चुकीची बसण्याची पद्धत, स्क्रीनची अयोग्य उंची आणि हाताला योग्य आधार नसल्याने खांदेदुखीची समस्या वाढते. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही वेदना पुढे तीव्र स्वरूप धारण करू शकते.
खांदेदुखीचा त्रास वाढतोय? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा सोप्या टिप्स
Published on

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण दिवसाचे ७ ते ९ तास संगणकासमोर बसून काम करतात. सतत एकाच स्थितीत बसल्यामुळे मान आणि खांद्यावर ताण येतो. चुकीची बसण्याची पद्धत, स्क्रीनची अयोग्य उंची आणि हाताला योग्य आधार नसल्याने खांदेदुखीची समस्या वाढते. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही वेदना पुढे तीव्र स्वरूप धारण करू शकते.

खांदेदुखीचा त्रास वाढतोय? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा सोप्या टिप्स
हार्मोनल बदलांमुळे चिडचिड? Periods काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

तज्ज्ञांच्या मते, योग्य पोस्चर ठेवणे हा खांदेदुखी टाळण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. खुर्चीवर बसताना पाठ सरळ ठेवावी, पाय जमिनीवर सपाट ठेवावेत आणि संगणकाची स्क्रीन डोळ्यांच्या समांतर असावी.

खांदेदुखीचा त्रास वाढतोय? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा सोप्या टिप्स
लिव्हर डॅमेज टाळायचंय? ब्लॅक कॉफीपासून हळदीपर्यंत 'या' गोष्टींचा आहारात करा समावेश, वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

दर ३० ते ४५ मिनिटांनी थोडा ब्रेक घेऊन उभे राहणे, हलके स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. खांदे मागे-समोर फिरवणे, मान हळूवार वळवणे आणि हात ताणणे यामुळे स्नायूंवरील ताण कमी होतो.

खांदेदुखीचा त्रास वाढतोय? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा सोप्या टिप्स
जिमशिवायही राहा फिट! दररोज स्वतःला द्या फक्त २० मिनिटं; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

याशिवाय, एर्गोनॉमिक खुर्चीचा वापर, टेबल-स्क्रीनची योग्य उंची आणि कीबोर्ड-माऊसची योग्य मांडणी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

खांदेदुखीचा त्रास वाढतोय? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा सोप्या टिप्स
झटपट आणि हेल्दी! नाश्त्यासाठी घरीच बनवा टेस्टी संत्र्याचा जाम, नोट करा रेसिपी

नियमित व्यायाम, योगासन आणि पुरेशी झोप घेतल्यासही खांद्याच्या वेदना कमी होण्यास मदत होते. वेदना सतत वाढत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in