केस गळतीवर नैसर्गिक उपाय; जास्वंद-डिंक कंडिशनरने मिळवा शायनी केस

केसांची निगा राखण्यासाठी फक्त शॅम्पू पुरेसा नसतो; योग्य कंडिशनिंगही तितकंच महत्त्वाचं असतं. बाजारातील महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी सहज मिळणाऱ्या जास्वंदीच्या फुलांपासून नैसर्गिक हेअर कंडिशनर तयार करता येतं.
केस गळतीवर नैसर्गिक उपाय; जास्वंद-डिंक कंडिशनरने मिळवा शायनी केस
'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

केसांची निगा राखण्यासाठी फक्त शॅम्पू पुरेसा नसतो; योग्य कंडिशनिंगही तितकंच महत्त्वाचं असतं. बाजारातील महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी सहज मिळणाऱ्या जास्वंदीच्या फुलांपासून नैसर्गिक हेअर कंडिशनर तयार करता येतं. आयुर्वेदात जास्वंदाला केसांसाठी गुणकारी मानलं जातं. यातील नैसर्गिक म्युसिलेज घटक केसांना मऊ, रेशमी आणि चमकदार बनवतो.

डिंक आणि अळशीच्या बियांसोबत जास्वंद वापरल्यास हे मिश्रण केसांच्या मुळांना बळकटी देतं, कोरडेपणा कमी करतं आणि स्काल्पला थंडावा देते. त्यामुळे केस गळणं कमी होण्यास आणि नैसर्गिक वाढीस मदत होते.

जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर बनवण्यासाठी साहित्य

  • १५ ते २० ताजी जास्वंदीची फुलं

  • २ ते ३ टेबलस्पून अळशीच्या बिया

  • २ टेबलस्पून डिंक

  • ३ ते ४ ग्लास पाणी

केस गळतीवर नैसर्गिक उपाय; जास्वंद-डिंक कंडिशनरने मिळवा शायनी केस
केस आणि त्वचेसाठी उत्तम! भरपूर Vitamin C ने घरगुती आवळा कँडी रेसिपी; कमी साहित्य, जास्त फायदे

कसं बनवायचं?

  • जास्वंदीची फुलं स्वच्छ धुऊन रात्रीभर पाण्यात भिजत ठेवा.

  • अळशीच्या बिया आणि डिंकही वेगवेगळ्या भांड्यात पाण्यात भिजवा.

  • दुसऱ्या दिवशी सर्व घटकांचे पाणी काढून मिक्सरमध्ये एकत्र वाटून पेस्ट तयार करा.

  • त्यात जास्वंद भिजवलेलं पाणी मिसळून एकजीव करा.

  • तयार मिश्रण काचेच्या बाटलीत साठवून ठेवा.

वापरण्याची पद्धत

केस शॅम्पूने स्वच्छ धुतल्यानंतर हे कंडिशनर स्काल्पपासून टोकांपर्यंत लावा. हलक्या हाताने मसाज करून काही मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा.

फायदे

  • केस गळणं कमी होण्यास मदत

  • कोरड्या केसांना नैसर्गिक ओलावा

  • स्काल्पला थंडावा, खाज व कोंडा कमी

  • फाटलेले केस (स्प्लिट एंड्स) कमी होण्यास सहाय्य

केस गळतीवर नैसर्गिक उपाय; जास्वंद-डिंक कंडिशनरने मिळवा शायनी केस
नासलेलं दूध फेकू नका! स्वयंपाक आणि स्किनकेअर दोन्हीसाठी फायदेशीर, जाणून घ्या त्याचे वेगवेगळे उपयोग

नियमित वापरल्यास केस अधिक दाट, मऊ आणि चमकदार दिसू शकतात. महागडे ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा हा घरगुती उपाय कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

(Disclaimer : या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले हे केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची नवशक्ति पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in