मुंबई

मीरा-भाईंंदर शहरात ५०० हून अधिक होळीचे आयोजन

मीरा-भाईंदर शहरात सार्वजनिक ठिकाणी एकूण ५८६ व खासगी ठिकाणी ११९१ होळीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयामार्फत देण्यात आली आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरात सार्वजनिक ठिकाणी एकूण ५८६ व खासगी ठिकाणी ११९१ होळीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयामार्फत देण्यात आली आहे. होळी व धुलीवंदन दिवशी मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन देखील पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. जर तसे केल्यास त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

होळी हा सण पारंपारिक असल्यामुळे तो सण महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने होळीचा सन साजरा करत असतो. मीरा-भाईंदर शहरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. सदर वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस दल सतर्क असणार असल्याचे पोलीस आयुक्तलयाकडून सांगण्यात आले आहे. होळीचा सण शांततेत पार पाडावा याकरिता अनेक उपाय योजना देखील राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयुक्तलयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे त्यांच्या हद्दीत होळी सणाचे आयोजन करणाऱ्या सर्वांना एकत्र बोलावत होळी व धुलीवंदन सण शांततेत पार पडण्या संदर्भात आयोजकांची बैठक घेत आहेत. त्याच बरोबर होळी व धुलीवंदन सणा करीत शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात ४२ पोलीस निरीक्षक, १४५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७२३ पोलीस अंमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १३१ जवान, १५२ होमगार्ड, दोन दंगल नियंत्रण पथके व राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे, अशा प्रकारचा बंदोबस्त करता पोलीस उपस्थित असणार आहेत.

दोन दिवस विशेष मोहीम

मीरा-भाईंदर शहरात होळीचे रंग, पिचकारी विक्रीचे स्टॉल उभरलेले दिसून येत होते. मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक चारच्या हद्दीत होळीचे रंग विक्री करता परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या सर्व स्टॉल वर सहाय्यक आयुक्त सुधाकर लेंडवे यांच्यामार्फत कारवाई करत स्टॉल हटवण्यात आले आहेत. याचबरोबर वाहतूक पोलीस देखील होळी व धुलीवदंन असे दोन दिवस विशेष मोहीम राबवत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वर कारवाई करणार आहेत

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा