हॉटेलची बदनामी थांबवा! हॉटेल व्यावसायिक संघटनेचे FDA ला आवाहन 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
मुंबई

हॉटेलची बदनामी थांबवा! हॉटेल व्यावसायिक संघटनेचे FDA ला आवाहन

हॉटेल आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्याच्या योग्य प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे तसेच तपासापूर्वीच त्यांची नावे सार्वजनिक करून त्यांना बदनाम करण्याची पद्धत थांबवावी, असे आवाहन हॉटेल व्यावसायिक संघटनेचे एफडीएला केले आहे.

प्रतिनिधी

धैर्य गजरा / मुंबई

हॉटेल आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्याच्या योग्य प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे तसेच तपासापूर्वीच त्यांची नावे सार्वजनिक करून त्यांना बदनाम करण्याची पद्धत थांबवावी, असे आवाहन हॉटेल व्यावसायिक संघटनेचे एफडीएला केले आहे.

‘हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया’, ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन’ यांनी संयुक्त आवाहनात नुकत्याच झालेल्या सार्वजनिक कारवाईच्या पद्धतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारवाईबाबतच्या प्रसिद्धीमुळे दशकांपासून उभारलेल्या व्यवसायांच्या प्रतिष्ठेचे भरून न येणारे नुकसान होण्याचा धोका आहे, असा इशारा या व्यावसायिक संस्थांनी दिला आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३२ अंतर्गत अन्न व्यावसायिकांना परवाना निलंबित किंवा रद्द करण्यापूर्वी आढळलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी ‘सुधारणा नोटीस’ जारी करावी, अशी मागणी हॉटेल संघटनांनी केली आहे. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आणि अनुपालन पुनरावलोकन पूर्ण होण्यापूर्वी आस्थापनांची नावे, छायाचित्रे किंवा व्हिडीओ फुटेज मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यापासून नियामक प्राधिकरणाने दूर राहावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

तपासण्यांबाबत वक्तव्ये करताना ‘एफडीए’ने सावधगिरी बाळगावी. सुरुवातीचे निष्कर्ष बऱ्याचदा तात्पुरते आणि सुधारणेस पात्र असतात हे लक्षात घेण्याचे नमूद केले आहे. तपासणीचे तात्पुरते निष्कर्ष सार्वजनिक करणे हे नैसर्गिक न्यायतत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे.

नियम पालनासाठी ‘एफडीए’सोबत काम करू

नियमांचे पालन करण्याची एक मजबूत संस्कृती निर्माण करण्यासाठी नियमकांसोबत काम करण्याची आपली तयारी दर्शवत ‘एफडीए’ला विनंती केली की, त्यांनी सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि न्याय्य वागणुकीत समतोल साधावा, जेणेकरून नियामक कारवाई ही दंडात्मक न राहता सुधारात्मक राहील.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात अनेक भागांत जोरधार; नदी, नाले, धरणे ओव्हर फ्लो; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

मंत्रालय कॅन्टिनमध्ये खराब भाज्या, फ्रीजही बंद; न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्रालय, विधानभवनातील कॅन्टिनची तपासणी

मुंबईत ८ हजार उघड्या मॅनहोलचा धोका कायम; साकीनाक्यातील दुर्घटनेनंतरही संरक्षक जाळ्या बसवण्याकडे दुर्लक्ष

तुम्ही भूतकाळ, भविष्याशी खेळू नका - राहुल गांधी

भाजपच्याच गुंडांनी केली पोलिसांवर दगडफेक; अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप