मेट्रो बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात किती तरतूद; पाहा तपशीलवार माहिती Free Pic
मुंबई

मेट्रो बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात किती तरतूद; पाहा तपशीलवार माहिती

मुंबई : देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकारणांमार्फत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकारणांमार्फत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, पुणे मेट्रो आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ही तरतूद केली आहे. हे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण मदत होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात देशाबरोबरच राज्यातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सेवा गतिमान करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. त्याप्रमाणे दरवर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात या प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात येते. त्याप्रमाणे एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात १२५५.०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ६९९.१३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ४००४.३१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने या प्रकल्पांच्या कामाला गती येणार आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी

अर्थसंकल्पात केलेली तरतूद

मुंबई मेट्रो १२५५.०६ कोटी

पुणे मेट्रो ६९९.१३ कोटी

एम.यू.टी.पी. ५११.४८ कोटी

एकात्मिक हरित शहरी गतिशीलता प्रकल्प ७९२.३५ कोटी

मुंबई-आहमदाबाद उच्च गती रेल्वे ४००४.३१ कोटी

आर्थिक क्लस्टर १०९४.५८ कोटी

ग्रामीण कनेक्टिव्हिटी प्रकल्प ६८३.५१ कोटी

महाराष्ट्र कृषी व्यवसाय नेटवर्क ५९६.५७ कोटी

नाग नदी सुधारणा प्रकल्प २९५.६४ कोटी

मुला-मुठा नदी संवर्धन २२९.९४ कोटी

ऊर्जा कार्यक्षम पंप सिंचन प्रकल्प १८६.४४ कोटी

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा