Canva
मुंबई

पतीला शारीरिक संबंधाला नकार देणे हा छळच; हायकोर्टाचा निर्वाळा, घटस्फोटाला आव्हान देणारे पत्नीचे अपिल फेटाळले

पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे, विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करणे तसेच पतीचा मित्रांसमोर अपमान करणे हा पत्नीने केलेला छळ आहे. यातून क्रूरता सिद्ध होते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आणि घटस्फोटाच्या आदेशाला आव्हान देणारे महिलेचे अपिल फेटाळले.

Swapnil S

मुंबई : पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे, विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करणे तसेच पतीचा मित्रांसमोर अपमान करणे हा पत्नीने केलेला छळ आहे. यातून क्रूरता सिद्ध होते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आणि घटस्फोटाच्या आदेशाला आव्हान देणारे महिलेचे अपिल फेटाळले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

पत्नीने पतीचा त्याच्या मित्रांसमोर अपमान करणे आणि त्याच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे हा पतीला मानसिक त्रास देण्याचाच प्रकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पुण्यातील कुटुंब न्यायालयाने क्रूरतेच्या आधारे पतीला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट मंजूर केला होता. त्या आदेशाला महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते आणि वैवाहिक हक्क परत मिळवून देण्याची विनंती केली होती. तिच्या अपिलावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पत्नीनेच पतीचा छळ केल्याच्या वस्तुस्थितीवर खंडपीठाने शिक्कामोर्तब केले. पती हा त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायाचा एक भाग आहे. पत्नीने पतीच्या कर्मचाऱ्यांसोबत केलेले वर्तन नक्कीच पतीला त्रास देणारे आहे. पतीला त्याच्या मित्रांसमोर अपमानित करणे ही 'क्रूरता' आहे. त्याचबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करणे ही देखील पत्नीने पतीसोबत केलेली क्रूरता आहे, असे निरिक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.

असे आहे प्रकरण

पुण्यातील कुटुंब न्यायालयाने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी पतीला क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट मंजूर केला होता. दाम्पत्याचे १२ डिसेंबर २०१३ रोजी लग्न झाले होते. मात्र संसाराच्या एका वर्षातच दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले आणि १४ डिसेंबर २०१४ रोजी ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. सुरुवातीला एप्रिल २०१५ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केले होते. तथापि, जुलै २०१५ मध्ये पत्नीने तिला जबरदस्तीने याचिका दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आणि घटस्फोटासाठी दिलेली संमती मागे घेतली होती. नंतर तिने पती व त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती