मुंबई

‘मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे आहे’ मिलिंद नार्वेकरांनी दिला चर्चांना पूर्णविराम

सभागृहाच्या कामकाजापूर्वी तासभर आधीच विधानभवन गाठून स्वपक्षातील उरल्यासुरल्या आमदारांसोबत त्यांनी चर्चा केली

प्रतिनिधी

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची सावली म्हणून फिरणारे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर कुठेच दिसत नव्हते. तेसुद्धा बंडखोर गटात सामील होणार... त्यांना मंत्रिपद मिळणार, अशा बातम्या कानावर पडत होत्या. मात्र ‘मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे आहे’, असे सांगत नार्वेकर यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावरची निष्ठा दाखवत ऐन बंडाळीत ठाकरेंभोवती न दिसलेले शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरविशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविवारी मैदानात उतरले.

सभागृहाच्या कामकाजापूर्वी तासभर आधीच विधानभवन गाठून स्वपक्षातील उरल्यासुरल्या आमदारांसोबत त्यांनी चर्चा केली. शिवसेनेचे आमदार असलेल्या दालनात जाऊन साळवी, पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांची भेट घेतली. त्यांच्यासोबतची चर्चा आटोपून कामकाज सुरू होताच नार्वेकर हे गॅलरीत गेले.

गेली पाच दिवस नार्वेकर हे मातोश्री आणि ठाकरेंपासून लांब झाल्याची कुजबूज ऐकायला येत होती. त्यातच एकनाथ शिंदे आणि नार्वेकरांच्या मैत्रीचा दाखला दिला जात होता. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्यासोबत असणारे नार्वेकर सध्या कुठे आहेत ? अशी चर्चा रंगली होती.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल २८-२९ सावलीसारखे वावरणारे नार्वेकर हे ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जात. त्यामुळेच मिलिंद नार्वेकर नेमके आहेत कुठे, ही चर्चा रंगली असताना त्यांच्या आई अत्यवस्थ असल्याने ते रुग्णालयात २४ तास बसून आहेत. आईच्या सेवेत तिच्या शेजारी असणे हे पुत्रकर्तव्य ते निभावत आहेत, असे समजते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत