मुंबई

आयडियल चॅम्प्सचे कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

प्रतिनिधी

आयडियल चॅम्प्सने सांघिक खेळाच्या बळावर बलाढ्य प्लॅटिनम आरएमएमएस संघाचे आव्हान ४ गुणांनी संपुष्टात आणले आणि स्व. सुरेश आचरेकर स्मृती १५ वर्षांखालील शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमी व जय भवानी क्रीडा मंडळ-चिंचपोकळी आयोजित स्पर्धेमध्ये शालेय मुलांच्या प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेमधील दोनदा विजेतेपद पटकाविणाऱ्या प्लॅटिनम आरएमएमएस संघाला आयडियल चॅम्प्सने पहिल्या डावातील ४ गुणांच्या आघाडीचा लाभ उठवीत नमविले.

राष्ट्रीय कबड्डीपटू व प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी कबड्डी प्रशिक्षक एकनाथ सणस, अविनाश महाडिक, सुनील खोपकर, अजित आचरेकर, प्रॉमिस सैतवडेकर, मंगेश चिंदरकर, रमाकांत चव्हाण, सुनील परब आदी उपस्थित होते.

चिंचपोकळी येथील सुरेश आचरेकर क्रीडांगणात आयडियल चॅम्प्सविरुध्द प्लॅटिनम आरएमएमएस यामधील अंतिम लढत दोन्ही संघांच्या तोडीस तोड चढाया व पकडीच्या बहारदार खेळामुळे एकूण गुणांचे शतक ठोकत शेवटपर्यंत रंगली. पहिल्या डावातील दोन लोणच्या जादा ४ गुणांचा लाभ उठवीत आयडियल चॅम्प्सने ५६-५२ अशी बाजी मारली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

ऑगस्टमध्ये मोफत

प्रशिक्षणासह कबड्डी स्पर्धा

दरम्यान, क्रीडा शिक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे शालेय संघांची बंदिस्त हॉलमध्ये मॅटवर होणार असल्याची माहिती संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व गोविंदराव मोहिते यांनी दिली.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश