FPJ
मुंबई

धक्कादायक! IIT बॉम्बेमधील विद्यार्थ्याची आत्महत्या; १०व्या मजल्यावरून घेतली उडी

मुंबईच्या आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) परिसरात शनिवारी (दि.२) एक धक्कादायक घटना घडली. एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबईच्या आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) परिसरात शनिवारी (दि.२) एक धक्कादायक घटना घडली. एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या १० व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.

मृत विद्यार्थ्याचे नाव रोहित सिन्हा (वय २२) असून तो मूळचा दिल्लीचा रहिवासी होता. तो IIT बॉम्बेमध्ये धातुकर्म (Metallurgical Engineering) शाखेच्या अंतिम वर्षात शिकत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी घेतली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्राथमिक तपासानुसार, शैक्षणिक तणावामुळे आत्महत्या केली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मोबाईल, रूममधील नोट्स आणि वैयक्तिक वस्तूंची तपासणी सुरू केली आहे.

पवई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार