Mumbai : यकृत, मधुमेहावर प्रभावी उपचारांचा नवा मार्ग मोकळा; ‘आयआयटी बॉम्बे’च्या संशोधनातून यश (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : यकृत, मधुमेहावर प्रभावी उपचारांचा नवा मार्ग मोकळा; ‘आयआयटी बॉम्बे’च्या संशोधनातून यश

‘आयआयटी बॉम्बे’ आणि त्यांच्या सहयोगी संस्थांमधील संशोधकांनी यकृतातील हानिकारक लिपिड्स कमी करणाऱ्या एका नव्या पेशीय यंत्रणेचा शोध लावला आहे.

Swapnil S

मुंबई : ‘आयआयटी बॉम्बे’ आणि त्यांच्या सहयोगी संस्थांमधील संशोधकांनी यकृतातील हानिकारक लिपिड्स कमी करणाऱ्या एका नव्या पेशीय यंत्रणेचा शोध लावला आहे. या यंत्रणेमुळे यकृतात चरबी जमा न होता रक्तातील हानिकारक लिपिड्स कमी होतात. या शोधामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी एक नवीन आणि अधिक सुरक्षित मार्ग खुला झाला आहे.

‘आयआयटी बॉम्बे’च्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक रूप मल्लिक यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. यात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयआयएसईआर) पुणे आणि कोलकाता येथील संशोधकांनीही सहभाग घेतला.

ही नवीन यंत्रणा रक्तप्रवाहात लिपिड्स कमी करण्यासाठी पारंपरिक एन्झाइम्स किंवा जनुकांचा वापर करण्याऐवजी लिपिड थेंबांच्या भौतिक हालचालींना लक्ष्य करून यकृतातून बाहेर पडणारी ‘व्हेरी लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन’ रोखू शकते. या पेशीय यंत्रणेत व्यत्यय आणल्याने यकृतात चरबी जमा होत नाही, जो औषध निर्मितीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि सुरक्षिततेचा फायदा आहे. हे संशोधन अद्याप पूर्व-क्लिनिकल टप्प्यात असून भविष्यात सस्तन प्राण्यांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे.

दशकभरापासून अभ्यास सुरू

दशकभरापासून प्राध्यापक मल्लिक यांच्या प्रयोगशाळेत या प्रक्रियेवर अभ्यास सुरू आहे. कायनेसिन-१ या प्रोटीनचा शेवटचा भाग इतर पेशींना कोणताही धोका न पोहोचवता यकृतातील लिपिड थेंबांच्या स्थानामध्ये व्यत्यय आणत असल्याचे संशोधकांना आढळले. संशोधकांनी उंदरांच्या यकृत पेशींवर आणि नंतर मानवासारखी लिपोप्रोटीन प्रणाली असलेल्या झेब्रा फिशवर हे प्रयोग केले.

बहुतेक पेशींच्या पडद्यांना दुहेरी थर असतो, मात्र लिपिड थेंबांभोवती एकच थर असतो. या आधारे संशोधकांनी ‘केटीडीपी’ नावाचा छोटा पेप्टाइड शोधला, जो प्रोटीनला लिपिड थेंबांना चिकटण्यापासून निवडकपणे रोखतो. ‘आयआयएसईआर कोलकाता’च्या प्राध्यापिका नीलांजना सेनगुप्ता यांच्या प्रयोगशाळेत कॉम्प्युटर सिम्युलेशनद्वारे याची खात्री करण्यात आली.
डॉ. अर्चिस्मान महापात्रा, या संशोधनाचे सह-लेखक

PF क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून आत्ताच करा 'हे' काम; EPFO चा सल्ला

डाबरच्या 'या' उत्पादनांवर FSSAI ची बंदी; ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप

'हवेतच २-३ मिनिटं विमान हेलकावलं'; थायलंडहून येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांचा थरकाप, Video

Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? Jio, Airtel आणि Vi ग्राहकांसाठी मोठी अपडेट