आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात पाच जिवंत काडतुसे सापडली; विद्यार्थ्याच्या मित्राला अटक 
मुंबई

आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात पाच जिवंत काडतुसे सापडली; विद्यार्थ्याच्या मित्राला अटक

पवई पोलिसांनी आयआयटी मुंबई कॅम्पसमधील वसतिगृहात बालमित्राच्या खोलीत पाच जिवंत ७.६५ मिमी काडतुसे ठेवल्याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे. ही काडतुसे १९ फेब्रुवारीला पोलिसांनी जप्त केली होती.

Swapnil S

मेघा कुचिक / मुंबई

पवई पोलिसांनी आयआयटी मुंबई कॅम्पसमधील वसतिगृहात बालमित्राच्या खोलीत पाच जिवंत ७.६५ मिमी काडतुसे ठेवल्याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे. ही काडतुसे १९ फेब्रुवारीला पोलिसांनी जप्त केली होती.

आरोपीचे नाव सर्वोत्कृष्ट आनंद सतीशचंद्र चौधरी असे असून त्याने महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलेले आहे. त्याचा मित्र अपूर्व मिश्रा हा आयआयटी मुंबई येथे बीटेकच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून चौधरीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, चौधरी जिवंत काडतुसे बाळगण्यामागील त्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. “विद्यार्थ्यांच्या खोलीत दारूच्या बाटल्या शोधण्यासाठी तपासणी सुरू असताना आणि मद्याचा वास येत असल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपास केला. त्यावेळी ही काडतुसे सापडली,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पाहुणा म्हणून आला आणि ठेवली काडतुसे

चौधरी १२ फेब्रुवारीला मुंबईत आला होता आणि त्याने मिश्रा याला आयआयटीच्या वसतिगृहात पाहुणा म्हणून राहण्याची परवानगी मागितली होती. मुक्कामादरम्यान त्याने ही काडतुसे मिश्रा यांच्या बॅगेत ठेवली होती. चौधरी व्हॅलेंटाईन डे दिनानिमित्त मैत्रिणीला भेटण्यासाठी मुंबईत आल्याचे पोलिसांनी सांगितले. तो दोन दिवस आधीच शहरात आला आणि वसतिगृहात पाहुणा म्हणून राहिला. व्हॅलेंटाईन डे दिवशी तो आपल्या मैत्रिणीसह आणि मिश्रा यांच्यासोबत चित्रपट पाहायला आणि जेवणासाठी बाहेर गेला. मिश्रा यांना बॅगेत काडतुसे असल्याची माहिती होती; मात्र उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी काडतुसे बाळगणे सामान्य असल्याचे सांगून त्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.

भांडणामुळे भांडाफोड झाला

या घटनेबाबत आयआयटी बॉम्बेने रविवारी निवेदन जारी केले. संस्थेने म्हटले आहे, “वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पाहुण्याने ही काडतुसे कॅम्पसमध्ये आणली होती. दोघेही बालमित्र आहेत. वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि त्यावेळी ही बाब आमच्या निदर्शनाला आली. त्यापैकी एक विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत होता. नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून खोल्यांची तपासणी करण्यात आली आणि दारूच्या बाटल्या सापडल्या. पुढील तपासणीत जिवंत काडतुसे सापडली. मात्र, कोणतेही शस्त्र सापडले नाही, असे स्पष्ट केले.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग