PM
मुंबई

मुंबईत हद्दीत बेकायदा फेरीवाल्यांचा बोलबाला; ९ हजारांहून अधिक जणांना अटक

Swapnil S

मुंबई : रेल्वे हद्दीत, लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल ट्रेनमध्ये बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यात भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४,३३९ जणांवर गुन्हे दाखल केले असून २४,३३४ जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ३.०५ कोटींचा दंड वसूल केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत केलेल्या कारवाईत मुंबई विभागात ९,३९३ जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा व गैरसोय टाळण्यासाठी बेकायदा फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुध्द अत्यंत यशस्वी मोहीम राबवली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत  २४,३३९ प्रकरणे नोंदवली गेली असून, २४,३३४ जणांना अटक केली आहे आणि रुपये ३.०५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

अशी झाली कारवाई

मुंबई विभाग

९३९४ जणांवर गुन्हा दाखल

९३९३ जणांना अटक

एकूण १.०२ कोटी रुपये दंड वसूल

भुसावळ विभाग

७२०६ गुन्हे दाखल

७२०५ लोकांना अटक

१.२९ कोटींचा दंड वसूल

नागपूर विभाग

३१८१ गुन्हे दाखल

३१७९ जणांना अटक

१ लाखांचा दंड वसूल

पुणे विभाग

१९९० जणांवर गुन्हे दाखल

१९९१ लोकांना अटक

१३.८८ लाखांचा दंड वसूल

रु. दंड  वसूल केला आहे.

सोलापूर विभाग

२५६८ जणांवर गुन्हे दाखल

२५६६ लोकांना अटक

२५.८७ लाखांचा दंड वसूल

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस