मुंबई

आरक्षित डब्यात बेकायदा प्रवास करणे पडले महागात ;३००हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल कलम १५५ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत १९७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नवशक्ती Web Desk

मुंबई : आरक्षित डब्यात बेकायदा प्रवास, रेल्वे हद्दीत भीक मागणे, मद्यपान करून उपद्रव निर्माण करणे अशा विविध प्रकरणांत ३११ हून जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाने ( आरपीएफ) विशेष - नाईट कोर्ट मोहीम राबवली. या मोहिमेत विविध प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल कलम १५५ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत १९७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कलम १४७ नुसार रेल्वे परिसरात घुसखोरी केल्याप्रकरणी ९९ जणांवर गुन्हा दाखल. रेल्वे परिसरात अनधिकृतपणे फेरी मारणे आणि भीक मागणे यासाठी कलम १४४ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत १३ जणांवर गुन्हा दाखल केला. भारतीय रेल्वे कायदा कलम १५९ अन्वये कायदा किंवा रेल्वे सेवकाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल १ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम १४५ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत रेल्वे परिसरात मद्यपान करून उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी १ व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.

रेल्वे नियमांची अंमलबजावणी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या हेतूने बुधवार २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे संरक्षण दल, मुंबई विभागातर्फे एक विशेष मोहीम राबविण्यात आली. कल्याण, टिटवाळा, बदलापूर, पनवेल, ठाणे, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली येथील रेल्वे संरक्षण कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेने राबविलेल्या या मोहिमेने प्रशंसनीय कामगिरी केली.

३११ जणांकडून ४७ हजारांचा दंड वसूल

विभागीय रेल्वे दंडाधिकारी, कल्याण यांच्या रात्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकूण ३११ व्यक्तींवर खटला चालवला गेला, ज्यामधून एकूण ४६,९५०/- रु. वसूल केले असून, सर्व दंड तातडीने भरण्यात आले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत