मुंबई

शिवडी-न्हावा शेवा पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते १२ जानेवारीला उद्घाटन

बोरीवली ते ठाणे हा १४४०० कोटींचा प्रकल्प आहे. त्यातून ठाणे ते बोरीवली हे अंतर १५ ते २० मिनिटांत कापले जाणार आहे.

Swapnil S

द्रौपदी रोहेरा/मुंबई : शिवडी-न्हावा शेवा पुलाचे १२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असे एमएमआरडीएच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाकडून आम्हाला तारखेबाबत दुजोरा मिळत नव्हता. कारण पंतप्रधान मोदी हे अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून १२ जानेवारीला शिवडी-न्हावा शेवा पुलाचे उद्घाटन होणार आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा पुलाचे उद्घाटन होण्याची रविवारी घोषणा केली होती. शिवडी-न्हावा शेवा उड्डाणपुलाच्या उद्घाटनाबरोबरच ऑरेंज गेट रस्त्याचे व ठाणे-बोरीवली बोगद्यांचे भूमिपूजन होणार आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह हा भुयारी मार्ग असणार आहे. त्यामुळे ईस्टर्न फ्री-वे ते मरीन ड्राईव्हदरम्यान वाहतुकीची वेळ वाचणार आहे. हा भुयारी मार्ग ४० मीटर खोल असणार आहे. कोस्टल रोड ते ईस्टर्न फ्री-वे अंतर १० मिनिटांत कापले जाणार आहे.

बोरीवली ते ठाणे हा १४४०० कोटींचा प्रकल्प आहे. त्यातून ठाणे ते बोरीवली हे अंतर १५ ते २० मिनिटांत कापले जाणार आहे. घोडबंदर रस्त्यावरील ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही.

३०० ते ३५० रुपये टोल

शिवडी ते न्हावा शेवा पुलासाठी एमएमआरडीएने ५०० रुपये टोल प्रस्तावित केला आहे. मात्र, निवडणुकीचा काळ पाहता तो टोल ३०० ते ३५० रुपये असण्याची शक्यता आहे

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक