मुंबई

'पार्ले-जी'च्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पार्ले-जी’ बिस्कीट कंपनीच्या मुंबई आणि गुजरातमधील कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्याचे वृत्त आहे.

Swapnil S

मुंबई : आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पार्ले-जी’ बिस्कीट कंपनीच्या मुंबई आणि गुजरातमधील कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्याचे वृत्त आहे. शुक्रवार सकाळपासूनच छापे टाकले जात असून करचोरी प्रकरणामध्ये ही कारवाई सुरू असल्याचे कळते.

आयकर विभागाला कंपनीवर करचोरी प्रकरणात संशय असून या कारवाईत अनेक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. मुंबईतील विलेपार्ले भागात कंपनीचे मोठे कार्यालय आहे. त्यासोबत मुंबईच्या इतर भागात असलेली कार्यालये आणि गुजरातमधील कार्यालये येथे सकाळपासूनच छापे टाकले जात आहेत. या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

देशातील मोठ्या बिस्कीट ब्रँडच्या कार्यालयांवर छापे पडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पार्ले ग्रुप ही पार्ले-जी, मोनॅको आणि इतर ब्रँड नावाने बिस्किटांची विक्री करणारी कंपनी आहे. सकाळपासूनच मुंबईतील कंपनीच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या ‘फॉरेन अॅसेट्स युनिट’ आणि मुंबईच्या ‘इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंग’कडून हे छापे टाकण्यात आले आहेत.

‘पार्ले-जी’ कंपनीचा यंदा नफा दुप्पट

‘पार्ले-जी’ कंपनीचा आर्थिक वर्ष २०२३ मधील ७४३.६६ कोटी रुपये नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये दुप्पट होऊन १,६०६.९५ कोटी रुपये झाला आहे. पार्लेचे ऑपरेशनल इन्कम २०१८-१९ मध्ये २ टक्क्यांनी वाढून १४,३४९.४ कोटी रुपये झाले. महसूल ५.३१ टक्क्यांनी वाढून १५,०८५.७६ कोटी रुपये झाला आहे. पार्ले बिस्किटाला अजूनही जोरदार मागणी असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’