मुंबई

६०० कोटींच्या करचोरीप्रकरणी कल्पतरू समूहाची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी

अवैध निधी सापडण्याची शक्यता आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : पायाभूत व बांधकाम क्षेत्रातील कल्पतरू समूहाने बोगस बिलांद्वारे ७०० कोटी रुपयांची करचोरी केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने कंपनीची चौकशी सुरू केली आहे. कंपनीची कागदपत्रे व डिजिटल यंत्रणा ताब्यात घेतली आहे. आयकर विभागाने ४ ऑगस्टपासून ७२ तास कंपनीवर छापेमारी केली होती.

प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ६०० कोटींची बोगस बिले आढळली आहेत. तसेच कंपनीचे खातेबुक व लेजर्स तपासताना आणखी अवैध निधी सापडण्याची शक्यता आहे.

कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील कल्पतरू बिल्डरच्या महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान येथील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने अनेक ठिकाणी छापेमारी केली. कल्पतरू समूहाचे संस्थापक मोफतराज मुनोत व व्यवस्थापकीय संचालक पराग मुनोत यांच्या कार्यालय व निवासस्थानी छापेमारी केली.

पायाभूत क्षेत्रात कल्पतरू समूह ही मोठी कंपनी आहे. त्यांचे प्रकल्प मुंबई व ठाण्यात आहेत. पाणीपुरवठा, जलसिंचन, रेल्वे, तेल व गॅस पाइपलाईन, फ्लायओव्हर, मेट्रो, महामार्ग आदी क्षेत्रात काम करते. कल्पतरू ग्रुप ऑफ कंपनी समूहात कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल, प्रॉपर्टी सोल्युशन इंडिया, श्री शुभम लॉजिस्टीक, कल्पतरू लिमिटेड आदी कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांवर प्राप्तिकर खात्याची नजर आहे.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार