मुंबई

"मंत्रीमंडळात एकही महिला..." ; जागतिक महिला दिनी अजित पवारांचा सत्ताधारींना टोला

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षामध्ये एकही महिला मंत्री नसल्याने लगावला टोला

प्रतिनिधी

आज जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर अनेक कार्यक्रम सुरु असताना महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही, हे थोडेसे कमीपणाचे आहे. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही. नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गाला योग्य वाटत नाही," अशी टीका त्यांनी केली.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित अपवर यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला नसल्याचे सांगत त्यांनी टीका केली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, ते कसे भरून काढणार? असा प्रश्न विचारत अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, विरोधकांनी याबाबत पुन्हा एकदा विधानसभेत सभात्याग केला.

जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत - मुख्यमंत्री; शिंदे सेनेची ६० जागांवर बोळवण?

बेटिंग ॲप : युवराज, सोनू सूदसह अनेकांची मालमत्ता जप्त; ED ची मोठी कारवाई; उथप्पा, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती यांचाही समावेश

SIR मुळे तमिळनाडूत ९८ लाख मतदारांची नावे वगळली

कोकाटेंची अटक टळली, पण शिक्षा कायम; HC कडून १ लाखाचा जामीन मंजूर; आमदारकीवरही टांगती तलवार

बुटीबोरी एमआयडीसीत स्फोट ; ६ कामगारांचा मृत्यू