मुंबई

आयपीएस अधिकाऱ्यांचे बढती व बदली सत्र सुरु

प्रतिनिधी

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या पाच आयपीएस अधिकाऱ्यांना बढती तर इतर पाच अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात महेश पाटील यांची ठाणे ग्रामीण येथून मुंबई शहरात बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाण्याचे पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ए. डी कुंभारे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त संरक्षण आणि सुरक्षा विभाग, ठाण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त पंजाबराव उगले यांची ठाणे प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांची ठाणे पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांची मुंबईच्या वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुण्याचे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची ठाणे शहर प्रशासन विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, तर पोलीस उपायुक्त अक्षय अशोक शिंदे (नागपूर शहर-जालना), अतुल कुलकर्णी (चंद्रपूर-उस्मानाबाद), नंदकुमार ठाकूर (नांदेड-बीड), बाळासाहेब पाटील (ठाणे-पालघर), राजेंद्र माने यांची मुंबईतून सोलापूर शहरात बदली करण्यात आली आहे.

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?

मुंबईत केजरीवाल Vs मोदी आमनेसामने ; शिवाजी पार्कात महायुती तर BKC मध्ये महाविकास आघाडीची सभा

मंत्री छगन भुजबळ महायुतीवर नाराज? गिरीश महाजन भेटीला, राजकीय चर्चेला उधाण