IPS अधिकारी रश्मी करंदीकर आणि पती पुरुषोत्तम चव्हाण 
मुंबई

पतीकडून मिळालेल्या पैशाबाबत IPS अधिकारी अनभिज्ञ!

आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी आपल्या बँक खात्यात आलेल्या २.६४ कोटी रुपयांची नोंद केली नव्हती. तसेच ही रक्कम त्यांचे वेगळे राहणारे पती पुरुषोत्तम चव्हाण जे प्राप्तिकर परतावा फसवणूक आणि इतर फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपी आहे त्यांच्याकडून आली होती, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

Swapnil S

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी आपल्या बँक खात्यात आलेल्या २.६४ कोटी रुपयांची नोंद केली नव्हती. तसेच ही रक्कम त्यांचे वेगळे राहणारे पती पुरुषोत्तम चव्हाण जे प्राप्तिकर परतावा फसवणूक आणि इतर फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपी आहे त्यांच्याकडून आली होती, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

ईओडब्ल्यूच्या तपासात चव्हाण आणि करंदीकर यांच्या बँक खात्यांशी संबंधित संशयास्पद व्यवहार आढळून आले. पुढील तपासासाठी ईओडब्ल्यूने पोलीस महासंचालक कार्यालयाला पत्र लिहून करंदीकर यांनी २०१७-२०१८ साठी दिलेल्या वार्षिक उत्पन्न घोषणेची माहिती मागवली.

अधिकाऱ्याने सांगितले, ईओडब्ल्यूने करंदीकर यांनी सादर केलेल्या मालमत्तेच्या घोषणेतील कागदपत्रांचे परीक्षण केले असता, चव्हाणने त्यांच्या बँक खात्यात २.६४ कोटी रुपये जमा केल्याचे आढळले. मात्र, त्यांनी ही रक्कम जाहीर केलेली नव्हती.

करंदीकर यांनी २.६४ कोटी रुपये इंट्रा-डे शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवले होते, मात्र त्यात त्यांना तोटा झाला, असेही अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीदरम्यान सध्या गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण विभागात ईओडब्ल्यूकडून अधीक्षक/प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या करंदीकर यांनी सांगितले की, त्यांच्या बँक खात्याचे व्यवहार त्यांचे पतीच बघत होते.

चव्हाणला ईओडब्ल्यूने ३२ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली होती.

कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - सुप्रीम कोर्ट; हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार

अमेरिकेच्या भूमीवरून मुनीर यांनी ओकली गरळ; भारताला अणुहल्ल्याची धमकी

ही पाकिस्तानची जुनीच खोड! अणुहल्ल्याच्या धमकीला भारताचे सडेतोड उत्तर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी; महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

महायुतीत पुन्हा कलगीतुरा रंगणार? नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरे करणार ध्वजारोहण