मुंबई

ईशा अंबानी जुळ्या बाळांसह भारतात दाखल; मुकेश अंबानी करणार एवढ्या कोटींचे सोने दान

देशातील अब्जाधीश उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या इशा ही आपल्या जुळ्या बाळांसह भारत दाखल झाली आहे

प्रतिनिधी

१९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या इशाने अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर आता इशा आपल्या जुळ्या बाळांसह भारतात परतली आहे. तिच्या स्वागतासाठी करुणा सिंधू निवासस्थानी जंगी तयारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील प्रसिद्ध मंदिरांतील अनेक पुजारी त्यांच्या स्वागतासाठी येणार आहेत. अंबानी कुटुंबाने त्यांच्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच, अंबानी कुटुंब तब्बल ३०० किलो सोने दान करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

ईशा तिच्या जुळ्या बाळांसह मुंबईत येत असताना त्यांच्यासोबत मुंबईतील नामवंत डॉक्टरांचा एक समूहही होता. अमेरिकेतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गिबसनही त्यांच्यासोबत भारतात आले. ईशा अंबानीचा विवाह पीरामल समूहाच्या आनंद पिरामल यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुले झाल्याने अंबानी, पीरामल कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच, मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया ठेवण्यात आले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?