PM
मुंबई

जागर नाटकांचा जागर स्पर्धांचा   

महाराष्ट्रात एकांकिका स्पर्धा मुबलक होतात, पण या नाट्य परिषदेच्या स्पर्धेस वेगळेच आकर्षण आहे.

Swapnil S

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १००व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत नाट्यकलेचा जागर होणार असून, विविध स्पर्धात्मक महोत्सवाचे आयोजन होणारआहे. महाराष्ट्रातील रंगकर्मींनी भाग घेऊन हा महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे. यात एकंकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य संगीत स्पर्धा याचा समावेश आहे.

हा महोत्सव रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम ,ठाणे , नवी मुंबई आणि मुंबईत होत असून, स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम अशा तीन फेऱ्यात होणार आहे. १५ जानेवारीपासून प्राथमिक फेरीस प्रारंभ होत आहे. अंतिम फेरी मुंबईत घेतली जाईल. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलाकारांसाठी ४ दिवसांच्या नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी केवळ लेखन केलेल्या एकांकिकेस २ लाख अथवा १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि उत्तेजनार्थ २५ हजार अशी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट आणि उत्तम अशा तीन स्तरावर पारितोषिके देण्यात येणार आहेत. एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क एक हजार, बालनाट्य यासाठी ५०० आणि इतर स्पर्धांसाठी १०० रुपये आहे. या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीनेच होणार असून, याची माहिती, नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

महाराष्ट्रात एकांकिका स्पर्धा मुबलक होतात, पण या नाट्य परिषदेच्या स्पर्धेस वेगळेच आकर्षण आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता सर्वानाच आह्रे. फक्त निवडलेले परीक्षक निकाल कसे देतील याकडे प्रकर्षाने लक्ष असेल कारण पारितोषिकांची रक्कम भरघोस आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश