मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बदलीची चर्चा असलेले ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे तर ठाण्याचे पोलीस आयुक्तपदी राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशुतोष डुंबरे यांचे नावही ठाणे पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. अखेर सोमवारी गृहविभागाने जयजीत सिंह यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जयजीत सिंह यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत होते.