मुंबई

जे. जे. शूटआऊट प्रकरण : अखेर टाडा न्यायालयाकडून अतिरिक्त पुराव्यांची नोंद

मुंबईत १९९२ मध्ये घडलेल्या बहुचर्चित जे. जे. शूटआऊट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने दोघा आरोपींविरुद्ध अतिरिक्त पुराव्यांची नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सूरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रामपती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोघांविरुद्ध पुरावे नोंदवण्यात आले आहेत. अनेक दशकांच्या विलंबानंतर गोळीबाराचा खटला पुराव्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे जे. जे. शूटआऊट प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत १९९२ मध्ये घडलेल्या बहुचर्चित जे. जे. शूटआऊट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने दोघा आरोपींविरुद्ध अतिरिक्त पुराव्यांची नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सूरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रामपती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोघांविरुद्ध पुरावे नोंदवण्यात आले आहेत. अनेक दशकांच्या विलंबानंतर गोळीबाराचा खटला पुराव्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे जे. जे. शूटआऊट प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

मुंबईत ९२च्या सुमारास अंडरवर्ल्ड कारवायांना ऊत आला होता. त्या काळातील गँगवारच्या कारवायांमध्ये जे.जे. रुग्णालयातील गोळीबाराच्या घटनेचा समावेश होता. गुंड शैलेश हळदणकर आणि दोन कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. १२ सप्टेंबर १९९२ रोजी पहाटेच्या सुमाराला हळदणकर याची हत्या करण्यात आली. अरुण गवळी टोळीचा कथित शार्पशूटर असलेला हळदणकर उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल झाला होता.

काय आहे कबुलीजबाब

विशेष न्यायालयात कबुलीजबाब तसेच इतर कागदपत्रांमध्ये गोळीबाराच्या संपूर्ण घटनाक्रमाचे वर्णन केले आहे. दाऊद टोळीच्या गुंडांनी पोलीस बंदोबस्ताचा अंदाज घेण्यासाठी आधी रुग्णालयाची रेकी केली. नंतर पहाटेच्या सुमाराला एके-४७ रायफल, पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरसोबत घेऊन दोन डझन शूटर रुग्णालयात पोहोचले. हल्लेखोरांनी हळदणकर उपचार घेत असलेल्या वॉर्डमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट असल्याचे भासवल्याचा आरोप आहे. टकला आणि राय यांच्याविरोधातील खटला अनेक दशकांच्या विलंबानंतर पुराव्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खलिदा झिया यांचे निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट'ने १३ जणांना उडवले; चौघांचा मृत्यू, ९ जखमी; CCTV मध्ये कैद झाली भीषण दुर्घटना

BMC Election : भाजप १३७, शिवसेना ९०; मित्रपक्षांनाही सोडणार जागा; महायुतीचा 'फॉर्म्युला' अखेर ठरला

"फक्त हाडांचा सांगाडा उरला"; केअरटेकर म्हणून आलेल्या दाम्पत्याने बाप-लेकीलाच घरात डांबले; अमानुष छळामुळे वडिलांचा मृत्यू

Thane Election : मनसेने २४ जणांना दिला एबी फॉर्म; नवीन चेहऱ्यांना संधी