संग्रहित छायाचित्र  
मुंबई

न्याय मिळण्यास विलंब हा अन्याय! सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे परखड मत

न्याय मिळण्यास उशीर होणे हा फक्त अन्याय नव्हे तर न्याय या संकल्पनेचा तो पूर्ण विनाश आहे, असे मत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी व्यक्त केले. सोबतच त्यांनी न्यायव्यवस्थेत एखाद्या प्रकरणात दिला जाणारा अंतरिम दिलासा याचे महत्त्वही त्यांनी विशद केले आहे.

Swapnil S

मुंबई : न्याय मिळण्यास उशीर होणे हा फक्त अन्याय नव्हे तर न्याय या संकल्पनेचा तो पूर्ण विनाश आहे, असे मत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी व्यक्त केले. सोबतच त्यांनी न्यायव्यवस्थेत एखाद्या प्रकरणात दिला जाणारा अंतरिम दिलासा याचे महत्त्वही त्यांनी विशद केले आहे.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेतील वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. परंतु आपल्या भाषणादरम्यान त्यांनी न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबावर तसेच त्यातून होणाऱ्या अन्यायावर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनुच्छेद २२६नुसार न्यायालय एखाद्या प्रकरणात जो अंतरिम आदेश देते, त्याला फार महत्त्व आहे, असे संगितले.

सर्वसामान्यांनी न्यायासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यापर्यंत वाट पाहू नये. न्यायापालिकेने कायद्याच्या राज्यात होत असलेल्या चुकांबाबत नेहमी सतर्क राहिले पाहिजे. एखादा छोटा शेतकरी किंवा प्रवेश न मिळू शकणारा विद्यार्थी यांना मिळालेला अंतरिम दिलासा हाच खूप मोठा न्याय असू शकतो, असे यावेळी सूर्य कांत म्हणाले.

सरन्यायाधीश सूर्य कांत भारतीय न्यायव्यस्थेवर मोठे भाष्य करताना म्हणाले की, भारतात आजघडीला लाखो प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. एखादा खटला २०ते २५ वर्षांपर्यंत चालतो. म्हणूनच सामान्यांना न्याय मिळण्यात फार उशीर होतो. हाच मुद्दा उपस्थित करत सूर्यकांत यांनी न्याय मिळण्यास उशीर होणे हा फक्त अन्याय नव्हे तर न्याय या संकल्पनेचा तो पूर्ण विनाश आहे, असे मत व्यक्त केले.

सोबतच त्यांनी न्यायव्यवस्थेत एखाद्या प्रकरणात दिला जाणारा अंतरिम दिलासा याचे महत्त्वही सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी व्यक्त केले.

उच्च न्यायालयांची भूमिका फार महत्त्वाची

देशातील उच्च न्यायालयांचे भविष्य हे ते किती सक्रिय आहेत, यावरून ठरते. न्यायालयांनी एखादे प्रकरण सुनावणीसाठी येण्याची वाट पाहू नये. शासन प्रणालीत असलेल्या कमतरता न्यायालयाने स्वतःहून शोधल्या पाहिजेत. जेव्हा कायदा एखाद्या प्रकरणावर बोलत नाही, तेव्हा न्यायपालिकेने पुढे येऊन त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी भूतकाळात उच्च न्यायालयांनी स्वतःहून प्रकरणांची सुनावणी घेतलेली आहे. राष्ट्रीय संकटात प्रवाशांच्या, श्रमिकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी न्यायालयाने पुढकार घेतलेला आहे. सक्रिय न्यायालय हे लोकशाहीचे रक्षक म्हणून भूमिका पार पाडू शकतात, असेही सूर्य कांत म्हणाले.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड