घाटकोपर हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

घाटकोपर हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द

घाटकोपर येथे फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

Swapnil S

मुंबई : घाटकोपर येथे फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत सत्र न्यायालयाने १७ वर्षीय आरोपीचा जामीन तातडीने रद्द केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीबोद्दीन शेख यांनी हा निर्णय देतानाच बाल न्याय मंडळाला आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याचे आदेश दिले.

५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजजवळ हा भीषण अपघात झाला होता. उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने चालवलेल्या भरधाव कारने स्कूटरला जोरदार धडक दिली होती. अपघातात स्कूटर चालक ध्रुमिल पटेल यांचा मृत्यू झाला होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती