कांदिवलीत विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू प्रातिनिधिक फोटो
मुंबई

कांदिवलीत विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू

कांदिवली (पश्चिम) येथील एम. जी. क्रॉस रोड क्रमांक ४, सागवाडी चाळीमागील परिसरात असलेल्या विहिरीत बुडाल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (५ जुलै) दुपारी घडली असून मंगळवारी (७ जुलै) याची माहिती प्राप्त झाली.

Swapnil S

मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील एम. जी. क्रॉस रोड क्रमांक ४, सागवाडी चाळीमागील परिसरात असलेल्या विहिरीत बुडाल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (५ जुलै) दुपारी घडली असून मंगळवारी (७ जुलै) याची माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार, प्रीत संदीप गानवे (वय १६) हा विहिरीत बुडाला होता. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरी आणि शिडीच्या साहाय्याने मुलाला विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी खासगी निधी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर प्रीत याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कांदिवली (पश्चिम) येथील चारकोप गावाजवळील डिंगेश्वर तलावात आणखी एक मुलगा बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दल, एनडीआरएफ कडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.

झाड पडल्याने पादचारी जखमी

दरम्यान, भायखळा नागपाडा येथील झीनत हॉटेलच्या समोर, कामाठीपुरा येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर एक झाड वीजेच्या खांबावर पडले होते. या घटनेत दिलबर खान ( ४०) हे जखमी झाले. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video