कोयता हे ‘शस्त्र’ नाही! पत्नीची हत्या करणाऱ्याला जन्मठेप; शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यात मात्र निर्दोष FPJ
मुंबई

कोयता हे ‘शस्त्र’ नाही! पत्नीची हत्या करणाऱ्याला जन्मठेप; शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यात मात्र निर्दोष

मुंबई : गावात शेतकामासाठी तसेच मुंबईतील झोपडपट्टी भागात वापरण्यात येणाऱ्या कोयत्याला 'शस्त्र' म्हणता येणार नाही. त्यामुळे कोयता जवळ बाळगला म्हणून कुणाला शस्त्रात्र कायद्यांतर्गत गुन्हेगार ठरवू शकत नाही, असे निरीक्षण दिंडोशी सत्र न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले.

Swapnil S

मुंबई : गावात शेतकामासाठी तसेच मुंबईतील झोपडपट्टी भागात वापरण्यात येणाऱ्या कोयत्याला 'शस्त्र' म्हणता येणार नाही. त्यामुळे कोयता जवळ बाळगला म्हणून कुणाला शस्त्रात्र कायद्यांतर्गत गुन्हेगार ठरवू शकत नाही, असे निरीक्षण दिंडोशी सत्र न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. याचवेळी पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली दिंडोशी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी पतीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यात मात्र निर्दोष मुक्तता केली.

पाच वर्षांपूर्वी, २७ फेब्रुवारी २०२० रोजी हत्येची घटना घडली होती. मालाड पूर्वेकडील सिद्धेश्वर नगरमध्ये तीन लहान मुलींसोबत राहणाऱ्या माया मोरे या महिलेची तिचा पती दिनेश मोरे याने हत्या केली. दिनेश पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. त्यातून दोघांमध्ये वाद व्हायचे.

याच वादातून दिनेशने मायाची हत्या केल्याचा सरकारी पक्षाचा आरोप आहे.

घटनेच्या पाच दिवसांपूर्वी मायाने दिनेशविरोधात कुरार पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यामुळे दुखावलेल्या दिनेशने कोयत्याने वार करून मायाला जीवे मारल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांनी दिनेशविरुद्ध हत्या तसेच हत्या करण्यासाठी कोयता बाळगल्याने शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिनेशला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षाने सबळ पुरावे सादर करून हत्येचा गुन्हा सिद्ध केला. सबळ पुरावांची दखल घेत न्यायालयाने आरोपी दिनेशला पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

मात्र शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपी दिनेशची शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश