मुंबई

Kurla BEST Bus Accident : बेस्ट अपघातातील महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Kurla BEST Bus Accident : कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बस अपघातातील गंभीर जखमी अवस्थेतल्या एका महिलेच्या अंगावरील दागिने मदत करण्याच्या बहाण्याने एक अज्ञान इसम चोरून नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Swapnil S

मुंबई : कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बस अपघातातील गंभीर जखमी अवस्थेतल्या एका महिलेच्या अंगावरील दागिने मदत करण्याच्या बहाण्याने एक अज्ञान इसम चोरून नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फातिमा कनिझ अन्सारी (५५) ही महिला या दुर्दैवी अपघातात बस खाली चिरडली गेली. घटनास्थळी ती जखमी अवस्थेत पडलेली असताना तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या एक व्यक्ती काढून घेत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा इसम दागिने काढत असताना, आपण हे दागिने सुरक्षित ठेवणार आहोत आणि या महिलेच्या कुटुंबीयांना याबद्दल सांगणार असल्याचे आजूबाजूच्यांना सांगत होता. मात्र. अन्सारी यांच्या कुटुंबीयांनी कुणीतरी बांगड्या चोरून नेल्याची तक्रारी पोलिसांत केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फातिमा अन्सारी या एस जी बर्वे मार्ग येथे इमारतीबाहेर वाट पहात उभ्या असताना बसने त्यांना चिरडले. त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुतद्ध भारतीय न्याय संहितेंतर्गत गुन्हा दाखल केला.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता