प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

कुर्ला उन्नत हार्बर स्थानकाला गती; पाचवा, सहावा रेल्वे मार्ग प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात

बहुप्रतीक्षित पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग प्रकल्प तसेच कुर्ला येथे हार्बर लाईनसाठी उभारण्यात येणाऱ्या उन्नत स्थानकाच्या कामाला आता प्रत्यक्षात गती मिळाली आहे. यासाठी शनिवार/रविवारच्या दिवशी १४.५ तासांचा मेगाब्लॉकद्वारे कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वे मार्ग बदलण्यात आला.

कमल मिश्रा

मुंबई : बहुप्रतीक्षित पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग प्रकल्प तसेच कुर्ला येथे हार्बर लाईनसाठी उभारण्यात येणाऱ्या उन्नत स्थानकाच्या कामाला आता प्रत्यक्षात गती मिळाली आहे. यासाठी शनिवार/रविवारच्या दिवशी १४.५ तासांचा मेगाब्लॉकद्वारे कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वे मार्ग बदलण्यात आला.

या योजनेचा भाग म्हणून, कुर्ला येथील नव्या उन्नत स्थानकासाठी जागा निर्माण करण्यासाठी विद्यमान हार्बर लाईनचा ट्रॅक पश्चिमेकडे हलवण्यात आला. हे नवीन उन्नत स्थानक ५वा व ६वा मार्ग योजनेचा एक भाग असून, ते हार्बर लाईनवरील नियमित वाहतूक तसेच कुर्ला येथे सुरू होणाऱ्या व समाप्त होणाऱ्या सेवा दोन्ही सांभाळण्यास सक्षम असेल. स्थानकासाठी विद्यमान हार्बर लाईनचे ग्राऊंड लेव्हल ट्रॅक वापरण्यात येणारी जागा आवश्यक आहे.

वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प

  • उन्नत मार्ग चुनाभट्टी स्थानकानंतर सुरू होऊन, टिळकनगर स्थानकाजवळील सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) क्रॉसओव्हरच्या आधीच परत मुख्य मार्गाशी मिळेल.

  • नवीन उन्नत कुर्ला स्थानकामध्ये एकूण तीन फलाट असतील. यापैकी एका फलाटावर पनवेलच्या टोकाला गाडी पलटवण्यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध असतील. यामुळे कुर्ला-पनवेल दरम्यान शटल सेवा चालविणे शक्य होईल.

  • तीन ट्रॅक सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी, तर नवी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी आणि कुर्ला येथे समाप्त होणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र वापरण्यात येतील.

Wardha : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरला लगावली जोरदार थप्पड; डॉक्टरांकडून कारवाईची मागणी, CCTV व्हिडीओ व्हायरल

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक; उल्हासनगरातील जिम ट्रेनरला अटक, सात आरोपी जेरबंद

Mumbai : १४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; उच्च न्यायालयाने गुन्हा केला रद्द