मुंबई

कुर्ला पश्चिम ते वांद्रे टर्मिनस बस सेवा; उपनगरातही वातानुकूलित डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत

अधिकाधिक प्रवाशांनी या बस गाड्यांच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबई उपनगरातही आता इलेक्ट्रिक वातानुकूलित डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. उपनगरात १० नवीन एसी डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असून, ३१० या बस मार्गावर वांदे बस टर्मिनस ते कुर्ला स्टेशन पश्चिम बस स्थानक या दरम्यान धावणार आहेत.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता मुंबई शहरानंतर उपनगरातही वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन ते वांद्रे बस टर्मिनस दरम्यान या मार्गावर धावणार आहेत. कुर्ला, बी.के.सी. या भागातील प्रवाशांची गैरसोय दुर करण्याकरिता बेस्ट उपक्रमातर्फे या भागात १० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. अधिकाधिक प्रवाशांनी या बस गाड्यांच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा या दृष्टीने बेस्ट उपक्रम नेहमीच प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २१ फेब्रुवारी २०२३ पासून पर्यावरणपूरक वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सध्या एकूण ४९ इलेक्ट्रिक दुमजली बसगाडया दाखल झाल्या असून, त्यापैकी २५ बसगाड्या दक्षिण मुंबईत प्रवर्तित करण्यात येत आहेत. या बस गाड्यांना मुंबईतील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

दोन्ही बाजूंनी स्वयंचलित प्रवेशद्वार, सीसीटीव्ही!

या बसगाड्या पर्यावरणपूरक असून, या बस गाड्यांमधून ध्वनी किंवा वायु प्रदूषण होत नाही. वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बस गाडीमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोईसाठी मोबाईल चार्जिंगची व्यवस्थाही असून, प्रवाशांना या दुमजली बसगाड्यांतून प्रवास करताना इतर सार्वजनिक परिवहन सेवेच्या तुलनेने कमी बस भाडे असणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी