आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार; जाणून घ्या महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे संपूर्ण नियम व विधी

मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं जातं. उद्यापनाशिवाय व्रत पूर्ण झालं असं मानलं जात नाही. नियमपूर्वक उद्यापन केल्यास देवी प्रसन्न होते आणि घरात कायमस्वरूपी सुख-समृद्धी व धनधान्य नांदतं, अशी धार्मिक धारणा आहे.
आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार; जाणून घ्या महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे संपूर्ण नियम व विधी
Published on

हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. मार्गशीर्ष हा नववा महिना असून धार्मिक दृष्टिकोनातून या महिन्याला विशेष महत्त्व आहे. जसं श्रावण महिन्याचं नातं भगवान शंकराशी जोडलं जातं, तसंच मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय मानला जातो. त्यामुळे या काळात केलेली पूजा, व्रत, उपास आणि दान यांना विशेष पुण्य लाभतो, अशी श्रद्धा आहे.

मार्गशीर्ष महिना आणि महालक्ष्मी पूजनाचे महत्त्व

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे दिवस महालक्ष्मी देवीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते. श्रद्धेने आणि नियमपूर्वक हे व्रत केल्यास घरात सुख-समृद्धी, धन-धान्य, ऐश्वर्य आणि सकारात्मक वातावरण नांदते, असं धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं जातं. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये मार्गशीर्ष गुरुवारी घटस्थापना करून देवीचं विधीवत पूजन केलं जातं.

आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार; जाणून घ्या महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे संपूर्ण नियम व विधी
मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : आज नैवेद्यासाठी बनवा रबडीसारखी दाटसर गाजर खीर!

२०२५ मधील मार्गशीर्ष महिन्याचे दिवस

२०२५ साली मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात २१ डिसेंबर रोजी झाली होती. या महिन्यात एकूण चार गुरुवार आले. महालक्ष्मी व्रत पाळणाऱ्या भाविकांसाठी हे सर्व गुरुवार महत्त्वाचे मानले जातात. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अंतिम गुरुवार १८ डिसेंबर २०२५ रोजी येत असून, याच दिवशी अनेक जण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करतात.

मार्गशीर्ष गुरुवाराचं धार्मिक महत्त्व

मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. धार्मिक कथांनुसार, भद्रश्रवाराजाच्या कथेमधून देवीने समाधान, कृतज्ञता आणि सद्भावनेचा संदेश दिल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी व्रत कथा वाचन, मंत्रजप आणि भक्तिभावाने पूजा केली जाते.

महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे महत्त्व

मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं जातं. उद्यापनाशिवाय व्रत पूर्ण झालं असं मानलं जात नाही. नियमपूर्वक उद्यापन केल्यास देवी प्रसन्न होते आणि घरात कायमस्वरूपी सुख-समृद्धी व धनधान्य नांदतं, अशी धार्मिक धारणा आहे.

आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार; जाणून घ्या महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे संपूर्ण नियम व विधी
Navaratri 2025 : उपवास करताय? आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा सल्ला; हे ४ पदार्थ खा आणि ऊर्जा मिळवा!

उद्यापनाची विधी प्रक्रिया

उद्यापनाच्या दिवशी पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केली जातात. घराची स्वच्छता करून चौरंगावर लाल वस्त्र अंथरलं जातं आणि घटस्थापना केली जाते. कलशात पाणी, अक्षता, दूर्वा, सुपारी आणि नाणं अर्पण करून महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र प्रतिष्ठापित केलं जातं. त्यानंतर विधीवत पूजा, व्रत कथा, मंत्रजप आणि आरती केली जाते. या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व असून सुवासिनी किंवा गरजू व्यक्तींना अन्नधान्य व आवश्यक वस्तू दान केल्या जातात.

मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे फल

धार्मिक समजुतीनुसार, मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत केल्याने आर्थिक स्थैर्य, मानसिक शांती, सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. जीवनातील अडचणी दूर होऊन यश आणि समाधान लाभतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

(Disclaimer: सदर लेख प्राप्त धार्मिक माहिती व सामान्य मान्यतांवर आधारित आहे.)

logo
marathi.freepressjournal.in