मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : आज नैवेद्यासाठी बनवा रबडीसारखी दाटसर गाजर खीर!

शिरा, शेवया, रबडी हे ठरलेले पर्याय असले तरी आजचा खास मार्गशीर्ष गुरुवार आणखी मंगलमय करण्यासाठी एक झटपट तयार होणारा, रबडीसारखा स्वाद देणारा वेगळा पर्याय- 'गाजर खीर'
मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : आज नैवेद्यासाठी बनवा रबडीसारखी दाटसर गाजर खीर!
Published on

मार्गशीर्ष महिना म्हणजे घराघरात देवीचं आगमन, पूजाअर्चा आणि मनोभावे नैवेद्य अर्पण करण्याचा पवित्र काळ. प्रत्येक गुरुवारी देवीसमोर गोड नैवेद्य ठेवण्याची परंपरा असल्याने घरात काहीतरी खास बनवण्याची लगबग सुरू होते. शिरा, शेवया, रबडी हे ठरलेले पर्याय असले तरी आजचा खास मार्गशीर्ष गुरुवार आणखी मंगलमय करण्यासाठी एक झटपट तयार होणारा, रबडीसारखा स्वाद देणारा वेगळा पर्याय- 'गाजर खीर'. थंडीच्या दिवसांत बाजारात सहज मिळणारे ताजे, लालसर गाजर खिरीला अप्रतिम चव देतातच, शिवाय ते आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी असल्यामुळे हा पदार्थ नैवेद्यासाठी परफेक्ट ठरतो.

चला तर मग, देवीला नैवेद्य देण्यासाठी आजच बनवा ही झणझणीत सुगंधी आणि दाटसर गाजर खीर!

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : आज नैवेद्यासाठी बनवा रबडीसारखी दाटसर गाजर खीर!
अशी बनवा Superfood मखान्याची खीर; जाणून घ्या साहित्य आणि रेसिपी

साहित्य :

  • गाजर - ३ ते ४ (किसून)

  • दूध - १ लिटर

  • तूप - २ चमचे

  • भिजवलेले तांदूळ - २ चमचे

  • वेलची पावडर - ½ चमचा

  • सुका मेवा - काजू, बदाम (भिजवून पेस्ट + काही तुपात भाजलेले)

  • साखर - चवीनुसार

  • जायफळ - चिमूटभर

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : आज नैवेद्यासाठी बनवा रबडीसारखी दाटसर गाजर खीर!
उपवासासाठी 'या' पद्धतीने करा साबुदाण्याची खीर; जळणार नाही चिकटणार नाही; आरोग्यासाठीही लाभदायक

कृती :

कढईमध्ये सर्वप्रथम दूध गरम करण्यासाठी ठेवा आणि ते मंद आचेवर दाट होईपर्यंत उकळू द्या. दरम्यान, भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये थोड्या पाण्यासह जाडसर पेस्ट करून घ्या. दुसऱ्या कढईत तूप गरम करून त्यात किसलेले गाजर घालावे आणि गाजरातील पाणी पूर्ण निघेपर्यंत ते परतून घ्यावे. गाजर व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात दाट झालेले गरम दूध आणि तांदळाची पेस्ट घालून सतत हलवत राहा, जेणेकरून खीर कढईला लागणार नाही. मिश्रणाला एक छान उकळी आल्यावर भिजवलेल्या काजूची पेस्ट घालून मिक्स करा. खीर घट्ट होत आल्यावर त्यात चवीनुसार साखर, वेलची पावडर, चिमूटभर जायफळ आणि तुपात भाजलेला सुका मेवा घालून व्यवस्थित ढवळा. काही मिनिटे शिजू दिल्यावर रबडीसारखी दाटसर, सुगंधी गाजर खीर नैवेद्यासाठी तयार होते.

logo
marathi.freepressjournal.in