मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीच्या थेट प्रक्षेपणाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर सोमवारपासून न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाला प्रारंभ झाला.
उच्च न्यायालय प्रशासनाच्या या निर्णयानुसार मुख्य न्या. आराधे आणि न्या. संदीप मारणे, न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले, न्यायमूर्ती एम. एस सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये, तसेच न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाच्या कामकाजाचे प्रक्षेपण सुरू झाले आहे.