कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कर्जदाराने थकवलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जामीनदाराने दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. भारतीय करार कायद्यानुसार कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाई करता येते...

Swapnil S

मुंबई : कर्जदाराने थकवलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जामीनदाराने दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. भारतीय करार कायद्यानुसार कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाई करता येते, असे निरिक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुणाल जाधव नोंदवले आणि आरोपी जामीनदार रुपा गुप्ता हिचे अपील फेटाळून लावले.

सातरस्ता येथील 'द बेजोड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड' या संस्थेने सभासद अनिलकुमार तिवारी याला नोव्हेंबर २०१२ मध्ये ९ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या कर्जासाठी रुपा गुप्ता या जामीनदार होत्या. कर्जदार तिवारीने कर्जाचे हप्ते नियमित भरले नाहीत. डिसेंबर २०१५ पर्यंत त्याच्याकडे ९,१४,७५२ रुपये थकबाकी होती. संस्थेने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जामीनदार नात्याने रुपा गुप्ताने थकबाकीच्या परतफेडीसाठी २९ डिसेंबर २०१५ रोजी ७,५०,००० रुपयांचा धनादेश संस्थेला दिला. परंतु, बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश वटला नाही. त्यानंतर संस्थेने कायदेशीर नोटीस पाठवूनही रक्कम न भरल्याने संस्थेने न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने युक्तिवाद फेटाळला

या प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयाने ९ मे २०१९ रोजी रूपा गुप्ता हिला 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट'च्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवले होते. या निर्णयाला गुप्ता हिने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मुख्य कर्जदारावर कारवाई न करता थेट जामीनदारावर कारवाई करता येणार नाही, असा युक्तिवाद गुप्ताच्या वकिलांनी केला. तथापि, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. कर्जदाराने कर्ज थकवल्यास जामीनदाराविरुद्ध स्वतंत्र कायदेशीर कारवाई करता येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : बनावट औषधप्रकरणी इंडुकेअरचे परवाने रद्द; उत्पादन, पॅकिंग, तपासणी व वितरण तातडीने बंद करा, FDA चे आदेश

पेपरफुटीला कठोर शिक्षा; १० वर्षे कैद, १० कोटी दंड; सुधारणांऐवजी शिक्षेवर भर; व्ही. राधा समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर

भाजप-अकाली दलाची पुन्हा युती; पंजाबात सत्ता आल्यास अकाली दलाचा मुख्यमंत्री: अमित शहा

शतकमहोत्सवी संमेलनाध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय

SIR विरोधात देशव्यापी आंदोलन; २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरी