मुंबई

वांद्रे टर्मिनसवर प्रवाशांची लूटमार; ५ मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ वाहन थांबल्यास ३० - ५० रुपये पार्किंग भुर्दड

स्थानकांवर प्रवासी सोडायला येणाऱ्या रिक्षा,टॅक्सी चालक किंवा खासगी वाहन चालकांकडून पार्किंगच्या नावाखाली अवाजवी पार्किंग दर आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर

प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस (एलटीटी) येथे अलीकडेच पेड पार्किंग सुविधा सुरु केली आहे. मात्र स्थानकांवर प्रवासी सोडायला येणाऱ्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा खासगी वाहन चालकांकडून पार्किंगच्या नावाखाली अवाजवी पार्किंग दर आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबद रेल यात्री परिषद या संघटनी रेल्वेकडे तक्रार केली आहे.

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे सुरू असलेल्या पेड पार्किंग सुविधेमध्ये प्रतिदिन शेकडो वाहने ये-जा करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पार्किंग सुविधेतील गैरकारभारामुळे सर्व सामान्य प्रवासी, वाहतूकदार यांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी प्रवाशांचे खासगी वाहन किंवा रिक्षा, टॅक्सीधारकांनी ५ मिनिटांपेक्षा काही अवधी वाहन उभे केल्यास अनुक्रमे ५० आणि ३० रूपये दर आकारले जाते. १५ ते ३० मिनिटांसाठी अनुक्रमे १०० आणि ५० रुपये आकारले जातात. पीक अप आणि ड्रॉप पार्किंगसाठी एवढे दर आकारून प्रवासी, रिक्षाचालक, टॅक्सीचालकांची रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यासमोर कंत्राटदाराकडून लूट केली जात आहे. त्यामुळे वाहतूकदार, प्रावसी चिंतेत सापडले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकांवर पीकप आणि ड्रॉपसाठीसाठी वाहन चालकांकडून पैसे घेण्यात येत आहे.

"स्थानकांवर प्रवाशांना सोडण्यासाठी ये- जा करणाऱ्या वाहन चालकांकडून पैसे घेण्यात येत आहे. रिक्षा व टॅक्सीमधील प्रवाशांना चढउतार करायला फक्त ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला की रिक्षा टॅक्सीला ३० रुपये आणि खासगी वाहना ५० रुपये शुल्क, १५-३० मिनिटापेक्षा ५० ते १०० रुपये आकारले जात आहेत. ही एका प्रकारची लूट सुरू आहे. पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसवर असलेल्या पार्किंग सुविधा तात्काळ बंद करून प्रवाशांची लूट थांबवावी."

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

पहिले वेअरेबल पेमेंट्स इकोसिस्टम लाँच; आयआयटी मद्रास-एनपीसीआयसोबत भागीदारी

सेक्सटॉर्शन प्रकरणात नवा ट्विस्ट; आमदाराला ब्लॅकमेल करणारी ‘महिला’ नव्हे तर 'बेरोजगार तरुण'

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! खचलेल्या, बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी मिळणार ३० हजारांपर्यंत अर्थसहाय्य