मुंबई

नवरात्रौत्सवात मुंबईत १ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरला परवानगी

प्रतिनिधी

यंदाच्या नवरात्रौत्सवात मुंबईत १ ऑक्टोबर या दिवशीही रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रौत्सवासाठी सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.

नवरात्रौत्सवात मुंबईत ३ आणि ४ ऑक्टोबर या दोन दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरला परवानगी देण्यात आली होती; मात्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने यंदा मोठ्या प्रमाणात दांडियाचे आयोजन केले आहे. मुंबईत ठिकठिकाणी दांडिया आयोजित करण्यात आले आहेत. भाजपकडून रात्री १२ वाजेपर्यंतची मुदत आणखीन एका दिवसाने वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गृहविभागाकडून तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला होता. आता त्याला मंजुरी देण्यात आली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करून सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, दोन दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे