मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सवर बनणार नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉल; मुंबई महापालिकेकडून मिळाली परवानगी

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाली आहे. घोड्यांच्या शर्यती आणि संबंधित उपक्रमांसाठी जुलै २०२४ साली मध्ये आरडब्ल्यूआयटीसीला भाड्याने दिलेल्या ९३ एकर जागेपैकी ३२.एकर जमीन प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाली आहे. घोड्यांच्या शर्यती आणि संबंधित उपक्रमांसाठी जुलै २०२४ साली मध्ये आरडब्ल्यूआयटीसीला भाड्याने दिलेल्या ९३ एकर जागेपैकी ३२.एकर जमीन प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे.

रेस कोर्स आर्किटेक्ट्सच्या प्रस्तावित १७००० चौरस मीटर क्लबहाऊसमध्ये दोन बेसमेंट पार्किंग लेव्हल आणि सात मजले असतील. यामध्ये वरच्या पाच मजल्यांमध्ये १७७ लॉजिंग रूम असणार आहेत. तर पहिल्या मजल्यावर बेकरी, डिपार्टमेंट स्टोअर, कार्ड आणि टेबल टेनिस रूम, बँक्वेट हॉल, प्ले एरिया, स्विमिंग पूल आणि स्वयंपाकघर असेल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

तसेच, बँक्वेट हॉल, स्वयंपाकघर आणि पेंट्रीसह दुसरे क्लबहाऊस देखील असणार आहे.

पर्यावरणवाद्यांचा विरोध

पर्यावरण कार्यकर्ता झोरू भाथेना यांनी या प्रकल्पावर टीका करताना म्हटले, रेसकोर्सचा हेतू केवळ घोड्यांच्या शर्यती व त्याच्या देखभालीसाठी होता. अतिरिक्त FSI मागणे म्हणजे सार्वजनिक जमिनीचा उघड उघड व्यावसायिक गैरवापर आहे. आम्ही पूर्वी १.३३ FSI च्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला होता, जो नंतर ०.३ पर्यंत खाली आणला गेला.

रेसकोर्सचा इतिहास

२११ एकर जमीन RWITC ला शंभर वर्षांपेक्षा जास्त काळासाठी भाड्याने देण्यात आली होती. २०१३ मध्ये भाडेपट्टा संपल्यानंतर, बीएमसीने त्यापैकी काही भाग ताब्यात घेऊन सुमारे ३०० एकरचा "सेंट्रल पार्क" विकसित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यात मुंबईच्या सागरी किनाऱ्यावरील १७५ एकर भागही समाविष्ट असेल.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री