मुंबई

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात केली वाढ

वाढलेले नवीन दर हे मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

प्रतिनिधी

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात चार रुपयांची तर पीएनजीच्या दरात तीन रुपयांची मंगळवारी वाढ केली. त्यामुळे सीएनजी दर आता ८० प्रति किलो असणार आहे. तर पीएनजी ४८.५० रुपये होणार आहे. वाढलेले नवीन दर हे मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

महानगर गॅस लि. कंपनीने एका पत्रकाद्वारे हे दर जारी केले आहेत. त्यात म्हटले आहे की, देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतींमुळे ‘एमजीए’च्या उत्पादन किमतीवर परिणाम होत असून त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता सीएनजीच्या किमतीत चार रुपये तर पीएनजीच्या किमतीत तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर २९ एप्रिलमध्ये वाढले होते. त्यावेळी चार रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले